बाल गणेश मंडळांच्या गणरायांचे नव्या दिवशी विसर्जन

165

हिमायतनगर तालुक्यातील वारंग टाकळी येथे बाल गणेश मंडळांची स्थापना करून गेल्या आठ दिवसापासून गणरायाची सकाळ संध्याकाळ नित्य नेमानेआरती केली जात होती आणि अनेक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात होते त्यामध्ये एके दिवशी मडकी फोडी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यामध्ये जवळपास 50 ते 60 स्पर्धक सहभागी झाले होते त्यामध्ये पहिला क्रमांक विकास लक्ष्मण हाके दुसरा क्रमांक ईश्वर कानोटे यांनी पटकावली होती त्यांना मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य ज्येष्ठ नागरिकांनी बक्षीसाचे वितरण केले

आणि शेवटच्या दिवशी म्हणजे नव्या दिवशी गणपतीची आरती करून‌ सकाळी ठीक आठ वाजता महाप्रसादाचे वाटप केळीच्या पानांमध्ये करण्यात आले म्हणून सर्व गावकऱ्याकडून बाल गणेश मंडळांचे कौतुक करण्यात आले आहे ं