नागोराव शिंदे
तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर तालुक्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाडकी बहिण सन्मान सोहळा उद्या दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता परमेश्वर मंदिर मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला असल्याचे शिंदे सेनेच्ये जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळिकर यांनी सांगितले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथभाई शिंदे व महायुती सरकारने महिलांच्या सन्मानाकरिता महत्त्वपूर्ण अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अमलात आणली आहे.
आपल्या हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये शिवसेना प्रवक्त्या डॉ.ज्योतीताई वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमांचा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी लाभ घ्यावा.
कार्यक्रमाचे ठिकाण
हिमायतनगर परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय
सोमवार दिनांक-१६सप्टेंबर २०२४ स.११वा. कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळिकर यांनी केले आहे